प्रतिनिधी/सांगली
जिल्हा कारागृह मध्ये पूर्वी आढळून आलेल्या 81 कैद्यांचा संपर्क झालेले आणखीन 40 कैदी कोरोना आढळून आले आहेत. ज्या कैद्यांना त्रास होत होता अशा 150 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उर्वरित अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना आता कारागृहातच एका बाजूला ठेवण्यात येणार आहे अशी माहिती वरिष्ठ कारागृह अधीक्षक सुशील कुंभार यांनी दिली .
गेल्या चार महिन्यापासून कारागृहात एक ही कैदी पॉझिटिव्ह आढळून आला नव्हता. पण चार दिवसापूर्वी 81 कैदी बाधित झाले त्यामुळे उर्वरित 150 कैदी चे स्वॅब घेतले त्यामध्ये 40 जण बाधित झाले आहेत. परंतु काही दिवसापासून जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी त्यामुळे कैद्यांचे वाढलेले प्रमाण त्यांच्या इन्कमिंग मुळे या कैद्यांना कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या सर्व कैद्यांची तब्येत चांगली असल्याची माहिती त्यांनी दिली. उपचार म्हणून या कैद्यांना आता अलगीकरण कक्षात ठेवण्यात येऊन त्याठिकाणी त्यांच्यावर डॉक्टरांच्या कडून उपचार करण्यात येणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








