सध्या क्षमते इतकेच 250 कैदी : नवीन कैद्यांना प्रवेश नाही : कोरोनापासून कारागृह दूर
प्रतिनिधी/सांगली
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सांगली कारागृहातील 129 पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये ज्या कैद्यांवर कोरोनाचे उपचार सुरू होते त्यातील दोन कैदी पळून गेले होते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेत कैद्यांना कोरोना होवू नये म्हणून सांगली कारागृहातील क्षमतेपेक्षा अधिक असलेले कैदी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहेत. सध्या जिल्हा कारागृहात फकत 250 कैदी ठेवण्यात आले आहेत. तसेच नवीन कैद्यांना प्रवेश बंद केला आहे.
जिल्हा कारागृहात यापुर्वी सातत्याने क्षमतेपेक्षा अधिक कैदी बंदी होते. त्यामुळे यातील एका जरी कैद्याला कोरोना झाला तर त्याचा संसर्ग इतरांना सहजपणे होवू शकत असे. त्यामुळे कारागृह प्रशासनाने यातून धडा घेवून त्यांनी तात्काळ याठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक कैदी हलविण्याची मागणी केली होती. त्यानुसार याठिकाणी 350 पेक्षा अधिक कैदी होती यातील जवळपास 100 कैदी हे कोल्हापूर येथील कारागृहात पाठविले आहेत. त्यामुळे सध्या सांगली कारागृहात 250 कैदी आहेत. तसेच नवीन कैद्यांना या कैद्यांच्यामध्ये प्रवेश दिला जात नाही. 250 कैदÎांसाठी हे कारागृह सुटसुटीत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास योग्य असे आहे.
कारागृह प्रशासनाकडून कठोर निर्णय
कारागृहातील एखाद्या कैदयाला कोरोना झाला तर त्याचा विपरित परिणाम इतर कैद्यावर सहजपणे होतो.त्यामुळे कारागृह प्रशासनाने यापुढील काळात कोरोनाच्या आपत्तीपासून कैद्यांचा बचाव करण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. हे कैदी कोणत्याही इतरांच्या संपर्कात येणार नाहीत याची दक्षता घेतली जाते तसेच कारागृहात बाहेरून येणाऱया वस्तू आणि लोकांना सॅनिटायझर केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेत कारागृहात कोरोनाचा शिरकाव करून दिला जात नाही. तसेच ज्या कैद्यांना न्यायालयात नेणे गरजेचे आहे. त्यांना न्यायालयात नेताना आणि पुन्हा कारागृहात आणल्यानंतरही काळजी घेतली जात आहे.
सध्या कारागृहात 232 पुरूष कैदी आहेत तर 17 महिला कैदी आहेत. नवीन कैदी कारागृहात घेतले जात नाहीत. तसेच ज्या कैद्यांच्या न्यायालयीन सुनावण्या उशिरांने आहेत अशा कैद्यांना कोल्हापूर येथील कारागृहात पाठविण्यात आले असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.








