मिरजेतील ‘त्या’ खासगी कोविड सेंटरला आयुक्तांचा अल्टीमेटम
प्रतिनिधी / मिरज
सांगली-मिरज रस्त्यावर कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर बिलासाठी मृतदेह आडवून ठेवला होता. ‘त्या’ खासगी कोविड सेंटरला आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने भेट देऊन रुग्णालय प्रशासनाची कानउघडणी केली.
कोविड सेंटरच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात कामात सुधारणा न केल्यास कोविड सेंटरचा परवाना रद्द केला जाईल, अशी सक्त आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.








