वार्ताहर / बागणी
बागणी – ढवळी रोड येथे बागणीचे कोतवाल रणजित भोई यांच्या नूतन बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये विजेचे कनेक्शन घेत असताना. कोतवाल रणजित भोई व विशाल लोहार हे लोखंडी पोल विद्युत तार ओढण्यासाठी खड्डा खोदून रोवत असताना अचानक तोल न सावरल्यामुळे लोखंडी पोल जवळच असणाऱ्या अकरा हजार विद्युत व्होल्टेजच्या तारांवर पडला त्यामुळे विशाल यांचा जागेवरच मृत्यु झाला.
तर कोतवाल रणजित भोई यांच्या हाताला व पायला भाजले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार बागणी येथील डॉ. डी बी पाटील यांच्या दवाखान्यात करण्यात आले. विशाल लोहार यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, दोन चुलते, दोन चुलत्या, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे बागणी, काकाचीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काकाचीवाडी येथे यापूर्वी देखील दोन घटना विद्युत झटक्याने अपघाताच्या घडल्या आहेत.