चेअरमन रावसाहेब पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / सांगली
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या संचालक मंडळाची सभा झाली. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2019-2020 सालासाठी सभासदांना 13 टक्के लाभांश देण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी जाहीर केला. सभासदांना लाभांश रुपाने रुपये दोन कोटी 12 लाखापेक्षा अधिक रकमेचे वितरण आता केले जाणार आहे.
संस्थेचे श्रध्दास्थान कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. डॉ. आप्पासाहेब चोपडे यांच्या प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने या सभेची सुरवात झाली. त्यानंतर संचालक ऍड. एस.पी. मगदूम यांनी दिवंगतांना श्रध्दांजलीचा ठराव मांडला. कोविड19 च्या पार्श्वभुमीवर सहकारी संस्थाना वार्षिक सभा घेण्यास शासनाने अद्याप मंजुरी दिली नव्हती. पण नुकत्याच महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाची बैठक होवून त्यामध्ये वार्षिक सभेच्या लाभांशासह काही विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार संस्थेच्या संचालक मंडळांना दिले आहेत. तसेच सभासदांनी देखील लाभांश जाहीर करणेचा निर्णय घेणेबाबत संस्थेकडे अर्ज केले होते. त्या पार्श्वभूमीवर संस्थेची सभा झाली. त्यामध्ये 13 टक्के लाभांश देणेस मंजुरी दिली.
संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सन 2019 -2020 या संपलेल्या आर्थिक वर्षाच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेचा स्वनिधी 43 कोटी 13 लाख असून, ठेवी 413 कोटी 24 लाख आहेत. विविध बँकेमध्ये गुंतवणूक रु. 153 कोटी 03 लाखाची आहे. कर्ज रु. 307 कोटी 98 लाख आहेत. संस्थेचा नेट एन्. पी. ए. 0.51 टक्के आहे. अहवाल वर्षात संस्थेस 5 कोटीचा निव्वळ नफा झाला आहे. 39 शाखामधुन संस्थेची सेवा सुरु आहे. संस्थेने आर्थिक वर्षात भक्कम प्रगती बरोबर सामाजिक कार्यातही ठसा उमटविलेचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम यांनी विषय वाचन केले. कर्मवीर पतसंस्थेने आपल्या लौकीकास साजेल अशीच प्रगती साधून सांगली जिह्यामध्ये एक आदर्श निर्माण केल्याची भावना संचालक मंडळाने व्यक्त करताना केली. सभेस संचालक ऍड. एस.पी. मगदूम डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, डॉ. रमेश वसंतराव ढबू, लालासो भाऊसो थोटे, श्री. ए.के.चौगुले, वसंतराव नवले, ललिता अशोक सकळे,तज्ञ संचालक डॉ. एस.बी .पाटील (मोटके), उपस्थित होते. आभार संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती चोपडे यांनी मानले.








