प्रतिनिधी / मिरज
कोरोनाने अनेकांचे बळी जात असतानाही महापालिकेचा बेडग रोडवरील कत्तलखाना मात्र, खुलेआम सुरूच आहे. शिवाय लगतच्या कचरा डेपोत कोविड रुग्णांसाठी वापरलेले साहित्य उघड्यावर टाकले आहे. नागरिकांच्या जीवीताशीच हा खेळ सुरू आहे.
त्यामुळे हा कत्तलखाना बंद न केल्यास धरणे, रस्ता रोको, गांव बंद सारखी आंदोलने करुन तो बंद पाडू, असा इशारा गुरूवारी पंचायत समितीचे प्रभारी सभापती अनिल आमटवणेंसह सदस्य आणि या भागातील सरपंच, लोकप्रतिनिधींनी दिला. गुरूवारी पंचायत समितीचे प्रभारी सभापती अनिल आमटवणे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी पाहणी केली.