कडेगाव : प्रतिनिधी
संपूर्ण देशभरात सुरु करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेचा चौथ्या टप्प्याअंतर्गत कडेपूर (कडेगाव) येथील उपकेंद्रामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संग्राम देशमुख यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावशाली असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यापासून लसीकरण मोहिम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागासह फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आणि त्यानंतर साठ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली होती. आता चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील वय असणाऱ्या सर्वच नागरिकांना लस दिली जाणार आहे.
संग्राम देशमुख म्हणाले, सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना विनंती आहे, की आपण सर्वांनी तातडीने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवून लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाची वापरण्यात येत असलेल्या दोन्ही लस या पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावशाली आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करून घेवून कोरोनास प्रतिबंध करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन केले.
यावेळी सरपंच रूपाली यादव, उपसरपंच संग्राम यादव, ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब यादव, अमर यादव, पंजाबराव यादव, दादासाहेब यादव, महावीर वाघमारे, सूर्याजी यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली मोतीकर, डॉ.आस्मा अत्तार, डॉ.योगेश पावले, रामदास फुलावरे, मीना फुलावरे, ग्रामविकास अधिकारी अनिल जमदाडे यांच्यासह आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








