प्रतिनिधी / कडेगाव
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही. राज्यातील दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. दुध व्यवसाय ग्रामीण शेतकऱ्यांचा आधार असून शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर सरकारने दुध दरवाढ दिली नाही व शेतकरी विरोधात धोरण घेतले तर जनता माप करणार नाही. असे प्रतिपादन सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
कडेगांव तालुका भारतीय जनता पार्टीचे वतीने 1ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता कडेगांव एस. टी. स्टॅण्ड चौकात अहिंसक मार्गाने आंदोलन केले. यावेळी दुध रस्त्यावर न ओतता कोवीड सेंटरला पाठविण्यात आले. यावेळी कडेगांव तालुका भाजपाचे अध्यक्ष धनंजय देशमुख, पंचायत समितीच्या सभापती मंगलताई क्षीरसागर, जि. प. सदस्य अॅड. शांता कनुंजे, उपसभापती आशिष घार्गे, माजी उपसभापती रविंद्र कांबळे हे प्रमुख उपस्थितीत होते. सुरवातीला अन्याया विरुद्ध एल्गार करणारे आण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून महाएलगार प्रतिमेचे पूजन करुन महाएलगार आंदोलन सुरु केले.
यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर 5 रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले. आता तर दुधाचे दर त्यावेळेपेक्षा खालावले आहेत. मात्र राज्यातील नाकर्त्या सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे.
यापुढे गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दुध भुकटी निर्यातीस प्रती किलो 50 रुपये अनुदान द्यावे, गाईचे दुध खरेदीचा दर वाढविणे व अन्य मागण्यांसाठी आज आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळत नाही तो पर्यत आम्ही स्वस्थ बसणार नाही जर राज्य शासनाने शेतकरी विरोधी धोरण घेतलेस त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा श्री देशमुख यांनी दिला.
यावेळी जेष्ठ नेते वसंतराव गायकवाड, कडेगांव नगरपंचायतीचे विरैधी पक्षनेते उदय देशमुख , कृष्णत मोकळे, हणमंत थोरात, माणिक मोरे, मारुती माळी, नितीन शिंदे, मारूती माळी, सुनिल भस्मे, पोपट शिंदे, प्रल्हाद रास्कर, आनंदराव शिंदे, दादा गायकवाड, किशोर मिसाळ, प्रकाश गढळे, दशरथ मोरे, अमरदीप मोरे, महेंद्र पवार, लक्ष्मण बकाळ, सुनिल पवार, सदाशिव माळी, शौकत पटेल यांचे ह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कडेगाव येथे भाजपाच्या वतीने दुध दरवाढीसाठी आंदोलन करताना जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, धनंजय देशमुख व अन्य उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








