प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यात मनसे कामगार सेना संयुक्त सरचिटणीस सचिन गोळे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत, तालुकाध्यक्ष तुकाराम भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवणी, वांगी, नेवरी अपशिंगे, देवराष्टे, नेर्ली, अंबक, साहोली, कडेगावसह इतर गावातील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी मनसेत पक्ष प्रवेश केला. यावेळी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते या उपस्थित पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत पक्षाचे पञ देऊन नियुक्ती करण्यात आली हा पक्ष प्रवेश सोहळा कडेगाव येथे संपन्न झाला.
यावेळी बोलताना तुकाराम भोसले म्हणाले की कडेगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गावोगावात शाखा स्थापन करण्यात येणार आहे. मनसे केवळ सत्तेसाठी काम करीत नसून समाजसेवा व समाजातील तळागाळातील घटकांचा न्याय देण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. समाजहितासाठी आपला पक्ष कडेगाव तालुक्यात भविष्यात काम करेल.
यावेऴी कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतिश वेताळ, विभाग अध्यक्ष अजय शिंदे वांगी, उपविभाग अध्यक्ष शंकर जगदाळे, तालुका सचिव प्रशांत पाटील यांनी स्वागत केले व आभार मानले.








