कडेगाव तालुक्यात धनगर आरक्षणासाठी गावो-गावी ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ आंदोलन संपन्न
प्रतिनिधी / कडेगाव
आदिवासी समाजाला दिले जाणाऱ्या आरक्षणाचे सर्व लाभ धनगर समाजाला मिळावेत, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने कडेगाव तालुक्यात गावो-गावी ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, मंदिरांसमोर हे ढोल बाजाओ आंदोलन करण्यात आले. धनगर समाज हा भटका असल्याने आदिवासींना दिले जाणारे आरक्षणाचे सर्व लाभ राज्यातील धनगरांनाही मिळावेत. तसेच राज्यात आणि केंद्रात एकाच प्रवर्गात धनगरांचा समावेश कराव अशी मागणी धनगर समाजाने या आंदोलनाद्वारे सरकारकडे करण्यात आली.
यावेळी बोलताना तालुका समन्वयक विकास माने म्हणाले की, धनगर समाज हा मागास असल्याने तो गेल्या काही वर्षांपासून रानावनांत भटकंती करीत आहे. त्यामळे या समाजाची म्हणावी तशी शैक्षणिक व आर्थिक प्रगती झाली नाही. सरकारने एसटी प्रवर्गाचे आरक्षण लवकरात लवकर लागू करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केले. यावेळी कडेगाव, वांगी, अमरापूर, आंबेगाव, हणमंतवडिये, वडियेरायबाग, पाडळी, देवराष्ट्रे यासह अन्य गावात आंदोलन करण्यात आले.