प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील नाट्यगृहे यांना शासन निर्णयानुसार बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडील शासन निर्णयान्वये कंटेनमेंट झोनच्या बाहेरील नाट्यगृहे व बंदिस्त सभागृहे/मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. याबाबत मानक कार्यप्रणाली मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
सर्व संबंधीत नाट्यगृहे व बंदिस्त सभागृहे मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार त्या त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी / कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल








