ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत विविध देशांतील ग्रँडमास्टर्ससह २२९१ बुद्धिबळपटू
सांगली / प्रतिनिधी:
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली आणि मस्तान चेस वर्ल्ड, आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीनिमित्त आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमध्ये भारतासह अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान,रशिया यासह अनेक देशातील ग्रॅण्डमास्टर्स, आंतरराष्ट्रीयमास्टर्स, फिडेमास्टर्ससह एकूण २२९१ खेळाडू सहभागी झाले होते. इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ५६ गुणांसह विजेतेपद पटकावले.
युक्रेनचा मानांकित खेळाडू स्टेल्माशेंको पावेल हा ५३ गुणांसह उपविजेता ठरला. दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्षणे यास ५० गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. अजरबैजानचा ग्रँडमास्टर वूगार रासलोव यास ४९ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर सिंड्रोव्ह जावोहीर यास ४९ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. अफगाणिस्तानचा फिडे मास्टर समीर साहीदी यास ४७ गुणांसह सहावे स्थान प्राप्त झाले. भारताचा ग्रँडमास्टर आर आर लक्ष्मण यास ४७ गुणांसह सातवे स्थान प्राप्त झाले. मंगोलियाचा फिडे मास्टर एनखबत्तर एनखनार यास ४७ गुणांसह आठवे स्थान प्राप्त झाले. रशियाचा ग्रँडमास्टर गाब्रलियन आर्तुर यास ४४ गुणांसह नववे स्थान प्राप्त झाले. अजरबैजानचा आंतरराष्ट्रीयमास्टर मुहम्मद मुराद अली यास ४४ गुणांसह दहावे स्थान प्राप्त झाले. इराणचा ग्रँडमास्टर मोसादेघपूर मसूद यास ४४ गुणांसह अकरावे स्थान प्राप्त झाले. अर्मेनियाचा फिडे मास्टर एमीन ओहान्यान यास ४३ गुणांसह बारावे स्थान प्राप्त झाले.
पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तसेच आंध्रप्रदेश येथील नामांकित खेळाडू आणि प्रशिक्षक मस्तान बाबू यांच्या मार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. तांत्रिक पंच म्हणून पवन राठी, सारंग विवेक पुरोहित, दीपक वायचळ आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.








