प्रतिनिधी / सांगली
एसटीच्या सांगली विभाग नियंत्रकपदी सुनिल ज्ञानेश्वर भोकरे यांची नियुक्ती झाली आहे. प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांच्याकडून ते लवकरच सुत्रे स्विकारणार आहेत.
भोकरे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी रत्नागिरी येथे काम केले आहे. सध्या ते रत्नागिरी एसटी विभागात विभाग नियंत्रक पदी कार्यरत होते. सांगली विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांची बदली होवून सहा ते सात महिन्यांचा काळ लोटला होता. गेले सहा महिने हे पद रिक्तच होते. त्यांच्या जागी अरुण वाघाटे हे प्रभारी विभाग नियंत्रक म्हणून काम पहात होते. रत्नागिरी विभाग नियंत्रक म्हणून कार्यरत असणारे सुनिल भोकरे यांची नुकतीच सांगली विभाग नियंत्रकपदी नियुक्ती झाली आहे.
सुनील भोकरे यांच्या कार्याची सुरुवात १९९० साली जत डेपोमध्ये क्लार्क पदावरुन सुरुवात झाली. तसेच ते सहाय्यक निरिक्षक पदावरही कार्यरत होते. त्यानंतर ते सांगली एसटी विभागात ९७-९८ साली आगार व्यवस्थापकपदी होते. सांगलीनंतर ते अमरावती जिल्ह्यातील तांदूळरेल्वे एसटी आगारात स्थानक प्रमुख पदावर होते. त्यानंतर मालवण येथे आगार व्यवस्थापक पदावरुन त्यांची बदली पुणे येथे विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून झाली होती. सध्या ते रत्नागिरी येथे विभाग नियंत्रक होते. आता ते सांगली विभाग नियंत्रक म्हणून काम पाहणार आहेत.








