सांगली / प्रतिनिधी
पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना ऑपरेटर दत्त इंडिया लिमिटेड( Datta India limited ) यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी (FRP)देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 2821 रुपये हा दर मिळणार आहे.
वसंतदादा कारखान्याचा 62 वा तर दत्त इंडिया चा पाचवा गळीत हंगाम गुरुवारी उसाची मोळी टाकुन प्रारंभ झाला. दत्त इंडियाचे संचालक चेतन धारू, करण रुपारेल, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil), (जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत कोणत्याही कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले नसताना वसंतदादा कारखान्याने एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाला आता गती येणार आहे.
यावेळी कामगारांना 19 टक्के बोनस आणि दहा किलो साखर देण्याचेही दत्त इंडियाचे संचालक चेतन धारू यांनी जाहीर केले. यावेळी वसंतदादा कारखान्याचे संचालक, दत्त इंडिया चे संचालक व कर्मचारी तसेच कामगार संघटनेचे प्रदीप शिंदे उपस्थित होते. उपाध्यक्ष मृत्यूनंजय शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले तर मुख्य अधिकारी शरद मोरे यांनी आभार मानले.
Previous Articleगृहमंत्री दिलीप वळसे पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
Next Article इचलकरंजी नगरपालिकेत युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न








