प्रतिनिधी / मिरज
महापालिकेकडून नागरिकांवर लादण्यात आलेला उपभोक्ता कर रद्द करावा, यासाठी वारंवार मागणी करूनही महापालिकेने अद्याप हा कर रद्द केला नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात सदरचा उपभोक्ता कर रद्द न केल्यास महापालिकेवर हल्लाबोल मोर्चा काढू, असा इशारा पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने देण्यात आला आहे.








