प्रतिनिधी/विटा
साखर उद्योगातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे, खानापूर तालुक्यातील पारे येथील उदगिरी शुगर्स ऍण्ड पॉवरचे व्हाईस प्रेसिडेंट एन. एस. कदम (मूळ रा. मुरगुड, जिल्हा कोल्हापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रचंड कामाची ऊर्जा आणि तितक्याच कडक स्वभावाचे उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र अशा साखरपट्ट्यात त्यांनी कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या एन. एस. कदम यांनी खानापूर सारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभा करण्याचे आणि यशस्वीपणे चालवण्याचे शिवधनुष्य पेलले. तत्कालीन मंत्री कै. डॉ. पतंगराव कदम आणि कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. शिवाजीराव कदम यांचा विश्वास सार्थ ठरवत कारखाना प्रगतीपथावर नेण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा चांगला उपयोग करीत त्यांनी कारखान्याची अल्पावधीत प्रगती आणि भरभराट करण्यात योगदान दिले.
यापूर्वी त्यांनी मराठवाड्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर जिल्ह्यातील नरंदे येथिल शरद सहकारी साखर कारखाना, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू शेतकरी सहकारी साखर कारखाना, सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस अशा विविध साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली. राजारामबापू कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम करताना एकाच वेळी इस्लामपूर, वाटेगाव, नागेवाडीचा यशवंत सहकारी आणि जतच्या राजे विजयसिंह डफळे साखर कारखाण्याचा कारभार त्यांनी पाहिला होता.
त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, मुलगा नीरज, कन्या डॉ. नुपूर असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार 7 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथे होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








