प्रतिनिधी / सांगली
कै. पांडुरंग भार्गव सोमण यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये उझबेकिस्थानचा इंटरनॅशनल मास्टर अब्दीमालिक अब्दीसालीमोव्ह हा विजेता ठरला. त्याने ८० गुणांसह विजेतेपद पटकावले. तमिळनाडूचा फिडे मास्टर एल. आर. श्रीहरी हा ६० गुणांसह उपविजेता ठरला. कर्नाटकचा मानांकित निहाल शेट्टी यास या स्पर्धेमध्ये ५३ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेय यास ५२ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. पश्चिम बंगालचा मानांकित खेळाडू राजदीप सरकार यास ५० गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले. या स्पर्धेमध्ये जगभरातून एकूण १०८० खेळाडू सहभागी झाले होते. सांगली जिल्ह्यातील खेळाडू सौमिल सारडा , स्नेहल बाबर , जीत सारडा , नंदन बजाज , सलोल सारडा , अर्णव पाटील , ऋषिकेश जाधव , केशव सारडा , नवीन करवडे , सर्वेश गवळी , सुधांशु पाटील यांना विविध वयोगटात उत्कृष्ठ खेळाडू म्हणून विशेष पारितोषिके दिली.
या स्पर्धेचे आयोजन सांगलीमधील नामांकित खेळाडू आणि बुद्धिबळ प्रशिक्षक . श्रेयस विवेक पुरोहित आणि सारंग विवेक पुरोहित यांच्या मार्फत करण्यात आले. तांत्रिक पंच म्हणून . शार्दूल तपासे आणि . दीपक वायचळ यांनी काम पहिले. तसेच . प्रकाश सोमण , चंद्रशेखर कोरवी आणि सौ. स्नेहा पाटील यांचे सहाय्य प्राप्त झाले.
Previous Articleसोलापूर महापालिका उपायुक्तपदी धनराज पांडे यांची नियुक्ती
Next Article सांगली : भिलवडी पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव








