प्रतिनिधी/इस्लामपूर
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी घोषित केलेली आहे. तरी इस्लामपूर शहरामध्ये विनाकारण वाहन घेवून फिरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. यामुळे पोलीस व आरोग्य विभागाची संयुक्त पथके तयार करून अशा व्यक्तींची रॅपीड अँटीजेन टेस्ट घेण्यात येत आहे.
विनाकारण मोटारसायकलवरुन फिरणाऱ्यांची टेस्ट पॉझीटीव्ह आल्यास त्याची रवानगी तात्काळ कोव्हीड केअरसेंटर मध्ये सक्तीने केली जात आहे. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शहरासह वाळवा तालुक्यातील ग्रामीण भागात याच पध्दतीची पथके नेमण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Previous Articleभारतीय विमानांना हॉंगकॉंगमध्ये नो एन्ट्री
Next Article दिल्लीत आज रात्रीपासून 6 दिवसांचा लॉकडाऊन!








