प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर शहरात कोरोना रुग्णांची वाढत आहे. सोशल डिस्टनसिंगचा पूर्ण फज्जा उडाला आहे. त्यामुळे रविवार ते मंगळवार या तीन दिवसांच्या काळात पुन्हा कडक लॉकडावून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या काळात केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी दिली.
शहरात एका महसूल अधिकाऱ्यांसह डॉक्टर, नगरसेवक, सहाय्यक पोलीस निरिक्षक अधिकारी यांच्यासह अन्य लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे चिंता वाढली आहे. बाजारपेठ पूर्वीसारखी गर्दीने फुलत आहे. अशातच शनिवार पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. या काळात पुन्हा गर्दीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडावूनची गरज होती. तालुका प्रशासनाने तीन दिवस लॉकडावूनचा निर्णय घेतला. गुरुवारी शहरात १०जण कोरोना पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात आठजण पॉझिटिव्ह आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








