इस्लामपूर /प्रतिनिधी
कोरोनाची लस जानेवारी महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल. त्या पार्श्वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात ड्रायरन (रंगीत तालीम) चा शुभारंभ प्रतिक जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हा समारंभ येथील उपजिल्हा रुग्णालयात झाला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, निवासी वैदकीय अधिकारी डॉ. वाय.बी कांबळे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरसिंह देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. कांबळे म्हणाले, जिल्ह्यात तीन ठिकाणी रंगीत तालमीचे नियोजन करण्यात आले आहे . यामध्ये इस्लामपूर, कवलापूर तसेच सांगलीतील हनुमान नगर येथे नियोजन करण्यात आले आहे. लस देण्यास सुरुवात होईल,त्यावेळेस कुठली ही अडचण येवू नये यासाठी रंगीत तालीम घेण्यात येत आहे. इस्लामपूरात २५ लाभार्थ्यांची यादी आली आहे.
सर्व प्रथम आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , डॉक्टर यांना तर दुसऱ्या टप्यात पोलीस, आर्मी, प्रशासनातील कर्मचारी व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्यात ५० वयोगटाच्या पुढचे व इतर आजार असणाऱ्या रुग्णांना लस देण्यात येणार आहे. या सर्व नियोजनासाठी रंगीत तालीम घेण्यात येत आहे.
Previous Articleलग्नासाठी मुलगी पाहण्यास गेला आणि मार खाऊन आला
Next Article मातंग समाजातर्फे डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार








