प्रतिनिधी / इस्लामपूर
टाटा ट्रस्टच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. वाढती रुग्णसंख्या व अपुरी आरोग्य सेवा या मध्ये हे हॉस्पिटल कोविड रुग्णांना आधार ठरणार आहे.
शहरात मार्च मध्ये पहिल्याच टप्प्यात कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे आरोग्य सुविधेची गरज निर्माण झाली.ना.पाटील यांनी टाटा ट्रस्टशी बोलणी करुन येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी निधीची मागणी केली. ट्रस्टने सुमारे १० कोटी रुपये खर्चाचे हॉस्पिटल उभारले. या हॉस्पिटलमध्ये ४०बेड रहाणार आहेत.यातील १० बेड अतिदक्षता विभागात आहेत. २०बेडचा जनरल वॉर्ड असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासह अन्य अद्ययावत सुविधा आहेत.येथे तज्ञ डॉक्टरांकडून कोव्हिड रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
दरम्यान ना.टोपे व ना.पाटील यांनी हॉस्पिटलची पहाणी केली. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम,आमदार मानसिंगराव नाईक,आमदार सदाभाऊ खोत, खा.धैर्यशील माने,माजी आमदार सदाशिवराव पाटील, देवराज पाटील,जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विश्वास साळुंखे, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Previous Articleसातारा : आमदार शशिकांत शिंदेंनी नागरी समस्यांचा केला निपटारा
Next Article सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा कोरोनाची एन्ट्री








