प्रतिनिधी/इस्लामपूर
सीमेवर लढणाऱ्या जवानांबद्दल प्रत्येकाला अभिमान असतो. ते आपले प्राण पणाला लावून देशसेवा बजावत असल्याने देश व प्रत्येक माणूस सुरक्षित राहतो. नवीन वर्षापासून या जवनांप्रति आदर म्हणून येथील प्रविण पाटील यांनी आपल्या ‘द मल्हार’ या हॉटेल मध्ये भोजन घेण्यास येणाऱ्या युनिफॉर्ममधील जवानांना संपूर्ण बील माफ व युनिफॉर्म नसल्यास ओळखपत्र दाखवल्यास बिलात ५०टक्के सवलत देण्याचा संकल्प केला आहे.
‘द मल्हार’ हे हॉटेल पेठ-सांगली रस्त्यावर शहराच्या प्रारंभी आहे. सांगली व अन्यत्र अनेक अधिकारी व अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्ती प्रवास करीत असतात.पाटील यांनी हॉटेलची रचना उत्कृष्ट केली आहे. निसर्गरम्य वातावरण, विनम्र सेवा यामुळे त्यांनी अल्पावधीतच खवय्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांबरोबरच या मार्गाने जाणारे अनेकजण दुपारी व रात्री जेवणासाठी थांबतात.
नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर दुपारीच लष्करी पोशाखातील काही जवान दुपारी भोजन करण्यास थांबले. पाटील यांनी आपल्या संकल्पाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. जवान त्यांच्या समवेतच्या लोकांनी जेवण घेतले. जाताना ते काउंटरवर बील भागवण्यास गेले. दरम्यान पाटील यांनी त्यांना आपला संकल्प सांगून बील घेण्यास नकार दिला. पण स्वाभिमान, शिस्त नसानसात असणाऱ्या या जवानांनी बील घेण्यासाठी आग्रह केला.पण पाटील यांचा खूप आग्रह झाल्यानंतर त्यांनी तयारी दर्शवली. पाटील यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे.
Previous Articleअनाथ मुलांना मिळणार शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य
Next Article अनाथ मुलांना मिळणार शासकीय नोकरीत प्रथम प्राधान्य








