शिराळा उपजिल्हा रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेडची सुविधा
प्रतिनिधी / शिराळा :
शिराळा उपजिल्हा रुग्णालयास २५ बेडचे सर्व साहित्य आमदार मानसिंगराव नाईक यांनी सुपूर्द केले. वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या विचारात घेऊन रुग्णाच्या सोयीसाठी आमदार नाईक यांनी हे साहित्य व्यक्तीगत रुग्णालयास पुरविले व वेगळा आदर्श निर्माण केला. या सर्व बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करणेत आली आहे. त्यामुळे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात आता ऑक्सिजनच्या बेडची संख्या १०० झाली आहे. या व्यवस्थेमुळे डोंगरी भागातील रुग्णांची सोय होणार आहे.








