आष्टा/वार्ताहर
आष्टा नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष शेरनबाब देवळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे देवळे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. देवळे यांच्या राजीनाम्यानंतर या पदी जिल्हा बँकेचे संचालक झुंझारराव शिंदे यांचे सुपुत्र धैर्यशील शिंदे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
दोन महिन्यापूर्वी स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे खंदे समर्थक शेरनवाब देवळे यांची आष्टा नगरीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. दोन महिन्याच्या कालावधीत देवळे यांनी आष्टा शहराच्या विकासास गती देण्याचे काम केले. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी आज उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यावेळी नगरसेवक विशालभाऊ शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बाबासो सिध्द उपस्थित होते. दोनच महिन्यात शेरनबाब देवळे यांचा राजीनामा घेतल्याने देवळे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








