शाळा १४ दिवस बंदचा निर्णय ; सर्वांचे घेतले स्वॅब
सलगरे / वार्ताहर
आरग ( ता.मिरज ) येथील एका खाजगी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आरग परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत ३५ विध्यार्थ्यांचे तर ८ शिक्षकांचे नमुने हे तपासणीसाठी घेण्यात आले असून, आता जवळपास उर्वरित विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचे रिपोर्ट अजून येणे बाकी आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आरग येथील सहावी ते आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या एका हायस्कूल मधील एक शिक्षक २९ मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर लगेच शालेय प्रशासनाच्यावतीने शाळा समिती व शालेय शिक्षकाची बैठक घेऊन शाळा १४ दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.