पती आणि सासू विरोधात ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील आरग येथे नयना क्रांतीकुमार वडगावे (वय 26) या विवाहितेने शुक्रवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
चार महिन्यांपूर्वी नयना ही चा क्रांतीकुमार याच्याशी विवाह झाला होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरातील दुसऱ्या मजल्यावर तिने आत्महत्या केली. पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून सदर आत्महत्या केली असल्याचा आरोप नयना हिच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली असून, नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.








