प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तालुक्यातील कोरोनाचा फैलाव वाढतच असून शुक्रवारी तालुक्यात विक्रमी 66 लोक पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण बाधित संख्या साडे आठशेवर पोहचली असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.
आटपाडी शहरात शुक्रवारी 24 लोक पॉझिटिव्ह आले. निंबवडे गावात तब्बल 21जण कोरोना पॉझिटिव्ह आले. दिघंची 2, लिंगीवरे 1, पिंपरी खुर्द 6, भिंगेवाडी 3, खरसुंडी 4, पुजारवाडी 4, विठलापूर 1 असे 66 लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यात 41 पुरुष आणि 25 महिला यांचा समावेश असल्याची माहिती पंचायत समिती आरोग्य विभागाने दिली.
Previous Articleसांगली : समडोळीत स्वाभिमानी कोरोना केंद्राचे आज उद्घाटन
Next Article सोलापूर : करमाळा शहरासह तालुक्यात आज ४२ पॉझिटिव्ह








