पाझर तलाव फुटला: रस्ते, पूल वाहून गेले
प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी तालुक्यात रविवारी पुन्हा पावसाने मुसळधार हजेरी लावली. खरसुंडी मंडळ मध्ये विक्रमी 126 मि. मि इतका पाऊस झाला. अतिवृष्टी मूळे मिटकी पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नेलकरंजी, खरसुंडी, शेटफळे, घरनिकी, तळेवाडी, माळेवाडी, काळेवाडी येथील पूल, रस्ते वाहून गेले. दुसऱ्यांदा अतिवृष्टी चा फटका आटपाडी तालुक्याला बसला असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.
रविवारी दुपारपासून आटपाडी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पश्चिम भागात पावसाने हाहाकार माजविला. त्यामुळे सर्वत्र फटका बसला. मिटकी पाझर तलाव फुटल्याने शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गोमेवाडी येथील को.प.बंधारा तुडूंब झाल्याने शेजारच्या शेती पूर्ण वाहून गेली. या नुकसानीची पाहणी माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितचे माजी सभापती हर्षवर्धन देशमूख, छोपवी चे अधिकारी फरास, सभापती भूमिका बेरगळ, गटविकास अधिकारी भोसले आदींनी केली.








