प्रतिनिधी/आटपाडी
आटपाडी तालुक्यात बुधवारी विठ्ठलापूर येथील एक 96 वर्षांची आजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 वर पोहचली आहे. पैकी झरे येथील एका महिला रुग्णाचा यापूर्वी मृत्यू झाला आहे.
आटपाडी तालुक्यात विविध भागातून आलेल्या लोकांमधून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आटपाडी, शेटफळे, जांभुळणी , बनपुरी, झरे, करगणी, लेंगरेवाडी, पिंपरी खुर्द, पिंपरी बुद्रुक, कामत, पुजारवाडी येथून कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मंगळवारी निंबवडे येथील दोघे पॉझिटिव्ह आले. तर बुधवारी विठलापूर येथील एक 96 वर्षांच्या आजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या.
मुंबई मुलुंड येथून या वृद्धा विठलापूर येथे आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार वय वर्ष 50 च्या पुढील बाहेरून आलेल्या विलगीकरन केलेल्या लोकांचे स्वाब घेण्यासह तपासणीची मोहीम आटपाडी तालुक्यात सुरू आहे. त्या मोहिमेत निंबवडे येथील 2 आणि विठलापूर येथे एक असे सलग दोन दिवसात तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परिणामी आटपाडी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 24 झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








