प्रतिनिधी /आटपाडी
आटपाडी तालुक्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे. कोरोना सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटर वगळता आटपाडी शहरासह तालुक्यात रुग्णासाठी अन्य सोय नाही. आटपाडी तालुक्यातील ही गैरसोय दूर करण्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजी पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजेवाडी साखर कारखान्याने ऑक्सीजनसह 100 बेडचे कोरोना सेंटर उभारण्यास होकार दर्शविला.
आटपाडी येथे कोरोना बाबत रविवारी आमदार अनिल बाबर यांनी बैठक घेतली . प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन लंगुटे, माजी जिप सदस्य तानाजी पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. आटपाडीतील वाढती रुग्ण संख्या, उपचाराची स्थिती , वैद्यकीय अधिकारी यांच्या अडचणी याबाबत चर्चा झाली. ग्रामीण रुग्णालयात 30 बेडची ऑक्सीजनसह सोय आहे .पण ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ऑक्सिजनची समस्या निकाली काढण्यात सह श्री सेवा हॉस्पिटल येथे तात्काळ कोरोना उपचार सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
राजेवाडी येथे श्री श्री सदगुरू साखर कारखान्याचे अध्यक्ष शेषागिरी राव यांची आमदार अनिल बाबर, तानाजी पाटील, प्रांताधिकारी व प्रशासनाने भेट घेतली. सामाजिक बांधिलकीतून कारखान्याने आटपाडीत शंभर बेडच्या कोरोना सेंटरची उभारणी करावी. अशी विनंती करण्यात आली आर्ट ऑफ लिविंग प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या जनसेवेचा वसा सोबत घेऊन शेषागिरी राव यांनी ऑक्सिजन सह 100 बीडचे कोरोना सेंटर उभारण्यास होकार दर्शविला. प्रशासनाने त्यांना जागा उपलब्ध करून देऊन अन्य प्रशासकीय बाबी पूर्तता करून देण्याचा निर्णय घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








