प्रतिनिधी / आटपाडी
आटपाडी ग्रामपंचायत टाकता असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी कोरोनाच्या दक्षतेसाठी वापरलेले पिपीई कीट उघड्यावर टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उजेडात आला. शासकीय आयटीआय कॉलेजलगत पिपीई कीटसह कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांचे शिल्लक राहिलेल्या अन्नाची पाकिटेही येथे फेकण्यात आले असुन हा प्रकार संतापजनक ठरला आहे.
आटपाडी शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची आत्तापर्यंतच्या एकुण संख्येने ७०० चा टप्पा दोन दिवासापुर्वीच पार केला आहे. तालुक्यातील एकुण बाधितांपैकी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असुन आटपाही शहर दिघंची, यपावाडी ही गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत. ही आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे.
कोरोना बाधितांवर उपचारासाठी शासकीय वसतीगृहाचे रूपांतर कोव्हीड केअर सेंटरमध्ये करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात कोव्हीड सेंटर सुरू करून ऑक्सिजनसह उपचार केले जात आहेत. तर श्री सेवा आयसीयु सेंटरमध्योही कोव्हीड उपचार सुरू आहेत. आटपाहींच्या शासकीय आयटीआय कॉलेजलगत आटपाही ग्रामपंचायतने कचरा डेपो केला आहे.
या कचरा डेपोच्या ठिकाणी कोरोनाबाबत वापरलेले पिपीई कीट उघड्यावार फेकण्यात आल्याचे धक्कादायक चित्र पहायला मिळाले. तसेच केअर सेंटरमधील रणांना दिलेल्या शिल्लक राहिलेल्या अन्नाचे शेकडो पिशव्याही अशाच उघड्यावर या ठिकाणी फेकण्यात आल्या आहेत. कौठुळीचे युवा नेते बापुसाहेब मगर यांनी ही वास्तुस्थिती निदर्शनास आणुन दिली. तर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुभाष जगताप यांनी प्रांत संतोष भोर यांच्या पुढे हे विदारक चित्र स्पष्ट केले. उघड्यावर पीपीई किट टाकल्याने आटपाडीच्या लवटेवस्ती तसेच कौठळीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Previous Articleसोलापूर शहरात 72 पॉझिटिव्ह, 4 मृत्यू
Next Article बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,52,192 वर








