प्रतिनिधी / सांगली
रविवारी नवीन 19 रुग्ण वाढले आहेत. तर पाच जण कोरोना मुक्त झाले आहेत. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल मधील ब्रदर चा सहकारी ही पॉझिटिव्ह आला आहे, तर पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील राजकीय नेत्याच्या संपर्कतील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.
पलूस तालुक्यातील पुणदी , जत तालुक्यातील बिळूर, तासगाव तालुक्यातील वाघापूर, वाळवा तालुक्यातील बावची, शिराळा तालुक्यातील ढाणेवाडी, निगडी येथील प्रत्येकी एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे. तर शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे दोन व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
शिराळा तालुक्यातील शिराळे खुर्द येथे एकाच दिवशी नऊ रुग्ण वाढले शिराळे खुर्द हे जिल्ह्यातील दुसरे कोरोना हॉटस्पॉट बनत चालले आहे यापूर्वी मणदूर हे हॉटस्पॉट बनले होते. रविवारी पाचजण कोरोना मुक्त झाले यामध्ये पलूस येथील दोघे, पुनवत, भाळवणी, निगडी, येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








