आंदोलनादरम्यानच सुरू झाल्या प्रसूतीच्या वेदना : तहसिलदारांना दिले पेढे
पलूस/प्रतिनिधी
आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून पलूस येथील तहसिलदार कार्यालयासमोर दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी ठक्क अभियानचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान आंदोनकर्त्या गर्भवती महिलेस प्रस्तुतीच्या वेदना सुरू झाल्या. यानंतर या महिलीने एका बाळास जन्म दिला. आंदोलनादरम्यान जन्म घेतलेल्या त्या बाळाचे नामकरण खुद्द तहसिलदार यांच्या नावावरून करण्यात आले. त्याचे नाव ‘ढाण्या ठेवण्यात आले.
दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी ठक्क अभियानचे आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे त्यांना जागा, घर मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा. मधुकर वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रमुख उत्तम मोहिते, सरचिटणीस डॉ. आर. बी. सौदागर, राज्य उपाध्यक्ष सनतन भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनात सहभागी झालेल्या अमृता मच्छिंद चव्हाण या गर्भवती महिलेस प्रस्तुतीच्या वेदना सुरू झाल्या. अशा परिस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिला खासगी रूग्णालयात दाखल केले. तिला मुलगा झाला असून पलूसचे तहसिलदार निवास ढाणे हे पलूस येथे तहसिलदार म्हणून कार्यभार पाहतात. त्या अनुषंगाने पारधी समाजाने या मुलाचे नाव ढाण्या ठेवले असून तोही पुढे मोठा होवून तहसिलदार व्हावा अशा भावनेतून आम्ही त्याचे ढाण्या असे नामणकरण केल्याचे सांगण्यात आले.
या बालकाच्या जन्माचे पेढे तहसिलदार यांना देण्यात आले. आंदोलनातील मागण्यांची पुर्तता न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात तालुकाकार्याध्यक्ष शंकर सुपणेकर, उषा चव्हाण, जयश्री शिंदे, राजू चव्हाण, क्रांतिवीर वायदंडे, उमेश चांदणे यांच्यासह पदादिकारी उपस्थित होते. आंदोलन स्थळी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








