प्रतिनिधी/विटा
खानापूर तालुक्यातील बलवडी (भा.) येथे लोकसहभागातून साकारलेल्या क्रांतिस्मृतीवनात चिमुकल्यांनी आँगस्ट क्रांतीदिनी अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.क्रांतिकारकांच्या स्मृती तेवत राहाव्यात, या उद्देशाने क्रांतिस्मृतीवनाची निर्मिती केली आहे. चिमुरड्यांनी स्मृतीवृक्षांना फुले वाहून क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला.
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले, त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट. क्रांती दिन म्हणजेच स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणा-या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. सर्वाच्या हृदयात क्रांतिवीरांची मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहणे अपेक्षित आहे. परंतू नव्या पिढीतील युवकांना त्याचा विसर पडतो की काय?, अशी अवस्था आहे. प्रशासकीय यंत्रणेसाठीही या दिवसाचे महत्त्व आता औपचारिकतेपुरते शिल्लक आहे.
ऑगस्ट क्रांती दिनाला ७८ वर्ष पूर्ण होत आहेत. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे या दिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल, ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांची धाबे दणाणले होते.
जेष्ठ नागरिक संघाचा ‘जिव्हाळा’
बलवाडीत जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी आँगस्ट क्रांतीदिन साजरा केला. यावेळी संघाचे अध्यक्ष बी. डी. कुंभार, क्रांतिस्मृतीवनाचे प्रवर्तक संपतराव पवार , वसंतराव जाधव, आर. एन. कास्कर, देवकुमार दुपटे, प्रा. प्रशांत पवार, जगन्नाथ पवार उपस्थित होते. त्यांनी चिमुरड्यांच्या हस्ते स्मृतिवृक्षाला अभिवादन करीत दोन पिढ्यांचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








