प्रतिनिधी / शिराळा
शिराळा तालुक्यातील करमाळे या गावी पाणी फौंडेशनचे संस्थापक अभिनेते अमीर खान लवकरच भेट देणार आहेत. स्वतः अमीर खान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. करमाळे हे गाव शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे करमाळे गावचे राकेश माने यांनी आमिर खान यांची भेट घेऊन त्यांना गावाला भेट देण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार अमीर खान करमाळे येथे येणार आहेत. गावात पाणी फौंडेशनच्या माध्यमातून काम सुरू करता येईल का. या हेतूने ते गावाला भेट देणार आहेत. त्यांच्या येण्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.








