प्रतिनिधी / सांगली
कोयना धरणात सध्या 92.38 tmc (87.77 %) पाणीसाठा आहे. कोयना धरणातून कोयना नदी पात्रात 55900 क्यसेसने विसर्ग चालू आहे. सध्या हाच विसर्ग चालू राहील. विसर्गात वाढ करण्याचे नियोजित नाही. असे हणमंत गुणाले अधिक्षक अभियंता कृष्णा खोरे महामंडळ यांनी म्हटले आहे अफवा वर विश्वास ठेऊ नका असे अवाहनही त्यांनी केले आहे.
विसर्गात काही बदल करण्याचे ठरले तर पूर्वसूचना देण्यात येईल. तरी कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.








