हॉस्पिटलची सीआयडी चौकशी व्हावी, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांची मागणी
प्रतिनिधी / सांगली
मिरज येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये 87 रुग्ण मृत पावले आहेत. या मयत झालेल्या लोकांची मानवी तस्करी झालीय का? असा प्रश्न आहे. या गंभीर प्रकरणातील लोकांना फाशी झाली पाहिजे व आयुक्तांना या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी पत्रकार बैठकीत केली.
विभूते म्हणाले, मनपा आयुक्त आणि दोन आरोग्य अधिकारी यांनी अपेक्स केअर सेंटरला परवानगी दिलीच कशी? डॉ. महेश जाधव आणि मदन जाधव यांच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये कोणत्याही सेवासुविधा नाहीत. केवळ एका व्हेंटिलेटरवर 87 रुग्नांच्या जीवाची त्यांनी माती केली आहे. त्यांच्याकडे अत्यावश्यक सुविधा नसल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. याप्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सीआयडी चौकशीची शिफारस करावी आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, तरच रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल.
यावेळी शंभूराज काटकर, बजरंग पाटील, मयूर घोडके, सुजाता इंगळे आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








