पंचायत समिती सदस्यांच्या आंदोलनाला यश, कत्तलखाना आरोग्यास हानिकारक असल्याचा अहवाल
प्रतिनिधी / मिरज
मनपाच्या मालकीचा मिरज-बेडग रोडवरील मोठय़ा जनावरांचा कत्तलखाना अखेर बंद करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून कत्तलखाना बंद करावा, यासाठी पंचायत समिती सदस्यांनी पाठपुरावा केला होता. आरोग्य विभागानेही सदरचा कत्तलखाना नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याचा अहवाल दिला होता. मनपा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कत्तलखाना बंद केला असल्याचे सांगितले आहे.
या कत्तलखान्यामुळे सुमारे सात किलो मीटर परिसरात दुर्गंधी पसरून आसपासच्या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जिल्हा आणि तालुका आरोग्यधिकाऱ्यांनी तसा अहवालही दिला होता.








