सांगली / प्रतिनिधी
आयर्विन पुलाच्या दुसऱ्या बाजूला महापुरात सांगलीवाडीच्या नागरी वस्तीत पोहोचलेली 12 फुटी अजस्त्र मगर वन विभागाने युवकांच्या मदतीने बुधवारी दुपारी पकडली आहे.
सुमारे १२ फूट लांबीची मगर कृष्णा नदीला आलेल्या महापुरात सांगलीवाडी गावातील नागरी वस्तीत आली होती. गावाचा बराच भाग पाण्याखाली होता. गेल्या दोन दिवसांपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली असताना बुधवारी सांगलीवाडीत सकाळी ११ च्या सुमारास धरण रोडवरील वीर मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही मगर दिसली. त्यांनी नागरीवस्तीत जात असलेल्या या मगरीला लिंगायत स्मशानभूमीकडे हुसकावून लावले व तात्काळ ही माहिती वनविभागाला कळवली. वनविभागाचे अधिकारी आणि सांगलीवाडी येथील नागरिकांच्या मदतीने ही मगर पकडण्यात अखेर यश आले. मगर पाहण्यासाठी सांगलीवाडी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
जूनमध्ये आयर्विन पुलाच्या दुसऱ्या बाजूला सखल भागात अजस्त्र मगरीचा वावर असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यावेळी शोध घेऊनही मगर सापडली नव्हती. आता लिंगायत स्मशानभूमी परिसरात हे मगर आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून महापुरामुळे कोणकोणत्या नागरी वस्तीत आल्या आहेत यावर चर्चा सुरू झाली आहे. डिग्रज येथे छतावर अडकून पडलेली मगर आजूबाजूच्या गावात मगरीच्या जाणवू लागल्याने जनतेत भीतीचे वातावरण असून वन विभागाने काही काळ सर्व गावात पथके तैनात करण्याची मागणी होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








