प्रतिनिधी / सांगली
महापुराचे पाणी जसजसे कमी होईल तस तसे सांगली शहरांमध्ये दुकानाची साफसफाई आणि स्वच्छतेच्या कामाला वेग आला आहे. शहरातील सर्व प्रमुख व्यापारी पेठा मध्ये तळघरातील पाणी उपसण्यासाठी शेती आणि ट्रॅक्टरच्या मोटारी लावण्यात आल्या आहेत. तळघरातील पाणी उपसण्यासाठी तासाला हजार ते बाराशे रुपये घेतले जात आहेत.
दोन ते तीन तास मोटारी लावूनही पाणी कमी होत नसल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. दरम्यान महापुरा बाबत प्रशासनाकडून अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे बहुतांश व्यापारी व दुकानदारानी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलवला आहे. पण दुकानाची साफसफाई आणि तळघरातील पाणी उपसा करण्यासाठी मात्र व्यापाऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत.








