प्रतिनिधी / सांगली
सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या काही सेलच्या पदाधिकार्यांच्या निवडी रविवारी जाहीर करण्यात आल्या. यावेळी काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष म्हणून याकूब हारूण मणेर यांची तर महापालिका स्वातंत्र्यसैनिक सेलचे अध्यक्ष म्हणून रघुनाथ बाळकृष्ण नार्वेकर यांची निवड करण्यात आली.
प्रारंभी आम आदमी पार्टीचे याकूब मणेर तसेच रेश्मा शरद थोरात, दीपक बाळासो बनसोडे, परवेज नगारजी, किरण कांबळे, सचिन पोटे (सांगलीवाडी) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रास्ताविक पैगंबर शेख यांनी केले, तर आभार बिपिन कदम यांनी मानले.








