प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरांमध्ये स्वाभिमानी विकास आघाडीला खिंडार पडले असून स्वाभिमानीचे माजी नगरसेवक बाळासाहेब गोंधळे, माजी नगरसेवक संतोष देवळेकर, हेमंत खंडागळे यांच्यासह, चर्मकार समाज सांगली, लक्ष्मण माने, प्रकाश संकपाळ, नारायण गायकवाड, विश्वनाथ संकपाळ, रोहित सोकटे, राजकुमार राऊत, विजय माळी, प्रशांत कांबळे, कुणाल कुदळे, रविराज मोने खा. संजय काका पाटील गटाचे अभिजीत पवार, सुनील भोसले, मुफीत कोळेकर, विलास बेले, रिपाईचे किरण माने शोभा पाटील, प्रदीप मानकर, युवती मिरज शहर अध्यक्ष सुमय्या काझी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजय बजाज, कमलाकर पाटील, राहुल पवार, सुरेश पाटील, मेनुद्दीन बागवान, आयुब बारगिर, सागर घोडके, विनया पाठक, अनिता पांगम,वंदना चंदनशिवे, डॉ. छाया जाधव, संगीता हारगे, राधिका हारगे, ज्योती आदाटे, प्रियांका तुपलोंढे, आशा पाटील, संध्या आवळे उपस्थित होते.








