ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा व शहर उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे यांचा अज्ञातांनी निर्घृण खून केला. कुपवाड एमआयडीसीतील रोहिणी कोल्डमध्ये आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खुनानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान, कुपवाडमध्ये पाटोळे यांचा खून झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मिरज उपविभागाचे पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल, सहाय्यक निरीक्षक निरज उबाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन ते तीन हल्लेखोरांनी खून केल्याची चर्चा परिसरात होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








