सांगली / प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात सर्व तालुके आणि गावागावात २५ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्या बरोबरच नेत्यांच्या दरात हलगी बजाव आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्य समन्वयक विलास देसाई आणि डॉ. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या निवडक पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडली. त्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आरक्षणाचा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार दि २५ रोजी सकाळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रमुख गावांमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल. क्रांती मोर्चाने ठरविल्याप्रमाणे अहिंसक मार्गाने हा ठिय्या धरण्यात येईल. त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधींना मराठा समाजाच्या आक्रोशाची जाणिव व्हावी म्हणून त्यांच्या दारात हलगी बजाव आंदोलन केले जाईल असे ठरविण्यात आले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना सांगली जिल्ह्यातून एक लाख मेसेज पाठविण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








