सांगली प्रतिनिधी
सांगलीतील शिवशंभो चौकात राहणारा गोरखनाथ उर्फ सुनिल लवटे हा सन २०२१ पासुन बेकायदेशीर सावकारी करीत होता. या सावकावर पोलिसांनी छापा टाकून त्यांचेकडील दोन सावकारी नोंदीच्या वहया व पिडीताची ज्युपीटर गाडी नं एमएच १० सी व्ही २७३७ तसेच आरोपी सावकारीसाठी वापरणारी मोटार सायकल एमएच १० सी पी ७४४७ तसेच आरोपीचा मोबाईल असा रुपये ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सावकारी सेल कडुन करण्यात आली. या प्रकरणात सावकारीसाठी पैसे पुरविणारा व्यक्ती निष्पन्न करण्यात आला असुन त्यालाही तात्काळ अटक करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे