प्रतिनिधी / सांगली
सांगलीत गुरवारी दुपारीच कोळोखी झाली आणि गडगडाटासह जोरदार मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली जोरदार पावसाने त्यामुळे खरीप.हंगामाची लगबग सुरु झाली आहे.
बुधवारी पावसाने सलामी दिली होती पण आज जमके जोरदार हजेरी लावली. दुपारी चक्क काळोख व्हावा असे अंधारुन आले व ढग गडगडाटासह बरसू लागले आणि बत्तीही गुल झाली.
जोरदार पावसाने अनेकांची त्रेधा उडाली. शहरात सखल भागात तळे साचले.शेतीसाठी हा पाऊस चांगला आहे तथापि पुरेसा पाऊस व ओल व तापमानात योग्य बदल झाल्या शिवाय पेरणी करु नका असे कृषी तज्ञ सांगत आहेत. दरम्यान सोयाबीन व शिराळा तालुक्यातील धुळवाफ पेरण्याना पाऊस सोईचा आहे. खरीप हंगामाची धांदल सुरु झाली आहे.








