सांगली : प्रतिनिधी
स्वप्नजीत पाटील आणि चालक मालक संघटना सांगली यांच्याकडून शनिवारी पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात दे धक्का आंदोलन करण्यात आले.सांगली स्टेशन रोड येथे चालक मालक संघटना आणि स्वप्नजीत पाटील मित्र परिवार तर्फे हे अनोखे आंदोलन झाले. पॅट्रोल डिझेल दरवाढ विरोधात राज्य सरकार ने अजून पॅट्रोल डिझेल चे दर कमी केले नाहीत. टॅम्पो, रिक्षा, वडाप, ट्रक ड्रायव्हर यांना पॅट्रोल डिझेल परवडत नाही पॅट्रोल ११० रुपये तर डिझेल १०० रुपये लिटर आहे.
कोरोनाच्या काळामध्ये दीड दोन वर्ष टॅम्पो, वडाप, ट्रक, रिक्षा बंदच होत्या. त्यामुळे आर्थिक मंदी चालू आहे. आणि त्यामध्ये पॅट्रोल डिझेल चे दरवाढ वाढतच चाललेले आहेत. राज्य सरकार ने पॅट्रोल डिझेल चे दर कमी केले नाहीत. म्हणून आज स्टेशन चौक येथे चालक मालक संघटना आणि स्वप्नजीत पाटील यांनी राज्य सरकार च्या पॅट्रोल डिझेल दरवाढ मुळे आज टॅम्पो ला धक्का मारत दे धक्का आंदोलन केले आहे. यावेळी स्वप्नजीत पाटील, पोपट गडदे, नाना उबाळे, बाजी शेट्टी, आकाश तरडे, आनंद शेजूर, धनाजी देवतके, रावसाहेब टेंगले, कोंडीबा सरगर, रावसाहेब सरगर, सुनील गडदे उपस्थित होते.