प्रतिनिधी / सांगली
राजकीय नेते विविध क्षेत्रात विस्तारत असतात आणि विविध योजना, प्रकल्प आपल्या मतदारसंघात खेचत असतात. सांगलीचे भाजप खासदार संजयकाका यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगावला उपळावीत खेचले व आता केंद्रीय विद्यालयाची मागणी केली आहे.
संजयकाका यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना भेटून आज मागणी निवेदन दिले आहे. सध्या पुणे येथे विद्यालय आहे. पण सांगलीला नाही. आगामी शिक्षण क्षेत्रात, शिक्षण पद्धतीत व अभ्यासक्रमात मोठे बदल. होणार अशी चर्चा आहे. या पार्श्वमूमीवर संजयकाका उचलत असलेली पावले महत्वाची ठरु शकतात.