प्रतिनिधी / सांगली
सांगलीत आण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभा करण्यात येणार आहे. तसेच मातंग समाजातील अनेक प्रश्न लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हा मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, अनु जाती (SC) प्रवर्गात लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाने असलेल्या मातंग समाजाची इथून पुढील काळात गांभीर्याने दखल घेऊन समाजातील अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करु. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नावर स्वता लक्ष घालून ते महामंडळ पूर्वरत सुरू करून त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करु. त्यामुळे समाजातील अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. सांगली ख्रिश्चन समाज दफनभूमीचा प्रश्न आयुक्त व महापौर यांना लवकरच सोडविण्याचा आदेश दिला जाईल. तसेच येणाऱ्या पुढील काळात मातंग समाजाची सर्व क्षेत्रात प्राधान्याने दखल घेतली जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी सांगली शहराध्यक्ष संजय बजाज यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी युवा नेते गॅब्रिएल तिवडे, जेष्ठ नेते व मार्गदर्शक प्रा.लक्ष्मण मोरे, व कुमार वायदंडे आदी उपस्थित होते.
Previous Articleसांगली : गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्थेत बदल
Next Article पोखलेत सुट्टीवर आलेल्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू








