सांगली / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सव्वा दोन महिन्यापासून बंद असलेली सर्व दुकाने सोमवार 14 जून पासून सुरू होणार आहेत. नव्या नियमानुसार अत्यावश्यक सह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के पेक्षा जास्त आणि दहा टक्के पेक्षा कमी तसेच ऑक्सीजन बेड ची टक्केवारी 25 ते 40 या दरम्यान असल्याने सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरांमध्ये गेला आहे .त्यामुळे अनलॉक ची पुढची प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पन्नास टक्के उपस्थिती सह हॉटेल्स सुरू होणार आहेत. तसेच मार्केट यार्ड, फळ मार्केट हेही सुरू होणार आहे. लग्नासाठी 25, तर अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना परवानगी देण्यात आले आहे. नव्या नियमांमध्ये इतर सर्व दुकाने वीकेन्डला म्हणजे शनिवारी व रविवारी बंद राहणार आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








